अखेर विधेयक मंजूर

March 9, 2010 1:26 PM0 commentsViews: 2

9 फेब्रुवारीसुमारे 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि अनेक अडथळे पार करत अखेर आज महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. इलेक्ट्रॉनिक मतदानात विधेयकाच्या बाजूने 186 मते पडली. तर केवळ 1 मत या विधेयकाच्या विरोधात पडले.विधेयक आता लोकसभेत मंजुरीसाठी जाणार आहे.दरम्यान हे विधेयक दलित, मागास महिलांच्या विरोधात आहे, असे सांगत यूपीएचा मित्रपक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने मतदानावर बहिष्कार टाकला. तृणमूलचे दोन्हीही खासदार मतदानाला अनुपस्थित राहिले. तर हाच मुद्दा उचलत बसपाने मतदानापूर्वी सभात्याग केला. तर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव याबाबत राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना भेटणार आहेत. सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र ते राष्ट्रपतींकडे सुपूर्द करणार आहेत.

close