‘बँक ऑफ बच्चेकंपनी’, या बँकेत विद्यार्थीच मॅनेजर आणि लिपिकही !

February 17, 2016 6:31 PM0 commentsViews:

nanded_school_bankनांदेड – 17 फेब्रुवारी : बँकेचा व्यवहार करणं भल्याभल्यांना जमत नाही. मात्र नांदेडच्या एका शाळेतले विद्यार्थी चक्क बँक चालवत आहेत. नांदेड पालिकेच्या उर्दू शाळेत ही बँक चालते. खर्‍या खुर्‍या बँकेसारखे व्यवहार या शाळेतल्या बँकेत चालतात. बँकेतले सर्व व्यवहार विद्यार्थांना शालेय जीवनापासून कळावेत म्हणून ही बँक तयार करण्यात आलीय.

नांदेड महापालिकेची ही आहे उर्दू शाळा..याच सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी बँक चालवण्याची किमया करुन दाखवली. खर्‍या-खर्‍या बँकेसारखाच विद्यार्थ्यांच्या बँकेत कारभार चालतो. खाते उघडन्यासाठी या बँकेत देखिल रीतसर अर्ज करावा लागतो. त्यानंतर खातेदांराना खाते क्रमांक आणि पासबूक दिले जाते. पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी इतर बँकेमध्ये जी स्लीप भरावी लागते. तीच स्लीप या बँकेत देखील भरावीच लागते. या बँकेत लिपीक, रोखपाल आणि बँक व्यवस्थापक पदाच काम मुली सांभाळतात. अत्यंत चोखपणे हा व्यवहार केला जातो. तीन ठिकाणी व्यवहाराची नोंद केली जाते. मध्यतंराच्या वेळेत शाळेतल्या बँकेत व्यवहार सुरू होतो.

शाळेत बँक सुरू झाल्याने विद्यार्थी देखिल आनंदीत आहेत. अगदी उत्साहाने या बँकेत विद्यार्थी पैसे जमा करत आहेत. आई-वडिलांनी खाऊसाठी दिलेले पैसे विद्यार्थी व्यर्थ करायचे पण बँकींगमुळे यांना देखिल बचतीच सवय लागलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close