मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागात मंत्री करणार मुक्काम !

February 17, 2016 7:38 PM0 commentsViews:

17 फेब्रुवारी : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा ‘आँखो देखा हाल’ पाहण्यासाठी राज्याचे प्रत्येक मंत्री दुष्काळग्रस्त भागात मुक्काम कऱणा आहे. प्रत्येक मंत्री मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात पाहणीसाठी जाणार आहे. दिवसभर त्या भागात थांबून आढावा घेणार आहे. 1mumbai_mantralyat

मराठवाड्याच्या दुष्काळी भागाचा आता मंत्री दौरा करणार आहेत. मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक मंत्री जाणार आणि तिथे दिवसभर थांबणार आहे. दिवसभर थांबून दुष्काळाच्या उपाययोजना कशा कार्यान्वित केल्या जातायत याचा आढावा घेणार आहेत. तसंच केलेल्या योजना खालच्या स्तरापर्यंत पोहोचतायत की नाही याचाही आढावा घेणार आहेत.

विरोधक कांगावा करतायत की, खालच्या स्तरापर्यंत योजना पोहचत नाहीत. त्यात किती तथ्य आहे याचाही आढावा मंत्री घेणार आहे. आरोग्य मंत्री दिपक सावंत, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या दुष्काळ दौर्‍याचं समन्वय करणार आहेत. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे याचा अहवाल सादर केला जाणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close