‘टँकर आला रे आला’, घोटभर पाण्यासाठी गावकर्‍यांची वणवण

February 17, 2016 8:41 PM0 commentsViews:

बारामती – 17 फेब्रुवारी : दिवसेंदिवस राज्यात दुष्काळाची स्थिती अधिक गंभीर होतेय. बारामतीच्या पश्चिम पट्‌ट्यातल्या पानसरेवाडी गावात हिच स्थिची आहे. 2200 लोकसंख्या असलेल्या पानसरेवाडीचं गावपण दुष्काळामुळं हरवलंय. पाण्यावाचुन सुकलेली पिकं आणि ओस पडलेली शेतं हेच चित्र आहे. ‘टँकर आला रे आला’ की असेल ते काम सोडून सार्‍यांचीच पाणी मिळवण्यासाठी घाई सुरू होते. एवढंच नाही तर घोटभर पाण्याच्या नादात कधी तरी एखाद्याचा जीव जायचा अशी भीती या गावकर्‍यांना आहे.

pansarewadi3दूरवर रानात पिकंच नाही जे काही आहे ते जळून गेलंय. अशातच मेंढ्याना चारा आणि पाणी शोधत मेंढपाळ पायपीट करतात. विहिरींनी कधीच तळ गाठलाय. अजून उन्हाळा जायचा आहे. तोवरच इतकी पाणीटंचाई आल्यानं मेंढपाळ चिंताक्रांत आहेत. जनाई शिरसाई योजनेतून कॅनॉल झाला मात्र गेल्या 2 वर्षांत एकदाही पाण्याचं आवर्तन या भागात दिलं गेलं नाही.

पाण्याअभावी अनेक बागा जळून गेल्या आहेत. जोपर्यंत शक्य झालं तोपर्यंत शेतकर्‍यांनी बागा जगवल्या मात्र जिथं पिण्याच्या पाण्याची भ्रांत तिथं बागा कशा जगवायच्या या काळजीनं अतिशय जड अंतःकरणानं बागांवर करवत फिरवण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आलीय, तिथं दुभत्या जनावरांनासाठी चारा कुठून आणणार… 30 किमी अंतरावर जाऊन चारा खरेदी करावी, तर खिशाला परवडत नाही. कारण वैरण महाग झाली शासनानं चारा छावण्या उभारल्या तर परिस्थिती बदलू शकते. मात्र या राज्यात सगळंच आलबेल. 70 हजाराची दुभती गाय शेतकरी 30 हजाराला विकत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close