यवतमाळमध्ये स्कूल बसच्या अपघातात 2 विद्यार्थी ठार, 30 जखमी

February 18, 2016 10:49 AM0 commentsViews:

yawatmal12

यवतमाळ – 18 फेब्रुवारी : यवतमाळ जिल्हय़ात स्कुल बसला कोळशाच्या ट्रकची धडक बसून झालेल्या भीषण अपघतात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 30 विद्यार्थी जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वणीतील वळगाव रस्त्यावर आज सकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त विद्यार्थी वणी येथील मायक्रॉन शाळेतील आहेत. सकाळी शाळेत जात असताना वळगाव रस्त्यावर कोळशाच्या ट्रकने या बसला धडक दिली. त्यात बस उलटून दोन विद्यार्थी जागीच ठार झाले. तर अन्य 30 विद्यार्थी जखमी झाले. या पैकी 4 विद्याथी गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले. तर उर्वरित विद्यार्थ्यांना यवतमाळ येथील शासकीय व खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close