मुंबईत परवडणारी घरं बांधणं खरोखरंच शक्य आहे का?

February 18, 2016 11:45 AM0 commentsViews:

विवेक कुलकर्णी, मुंबई

18 फेब्रुवारी : ‘मुंबईत परवडणार्‍या घरांची आवश्यकता आहे, त्यामुळे एसआरए आणि म्हाडानं अशी घरं बांधायला हवीत. परवडणारी किमान 5 लाख घरं बांधण्यात गुंतवणूकदारांना स्वारस्य आहे. अशा घरांसाठी गुंतवणूक करण्यास अनेक देश तयार आहेत’, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या ‘मेक ईन मुंबई’ या चर्चासत्रात बिल्ट ईन मुंबईचा नारा दिला. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणारी घरं खरोखरच मिळणार का याची चर्चा सुरू झाली आहे.

construction

पण हे खरोखर शक्य आहे का याबद्दल साशंकता व्यक्त होते आहे. मुख्यमंत्र्यांनी परवडणारी घराची व्याख्या काय आणि कोणाला परवडणारी घरं हे स्पष्ट केलेलं नाही अशी टीका नगर रचनाकार चंद्रशेखर प्रभू यांनी केली आहे. 2 कोटींचा फ्लॅट परवडणारे 1 टक्काही लोक सध्या मुंबईत नाहीयेत असही प्रभू यांनी म्हटलंय.

सध्याच्या परिस्थितीत राज्याच्या मुख्य सचिवांनादेखील ते राहतात त्या भागात त्यांनादेखील घरं घेण मुश्किल आहे असही प्रभू यांनी म्हणलं आहे.

सध्याची परिस्थिती परवडणारी घरं शक्य आहेत का?

  • मुंबईची लोकसंख्या : सुमारे 1.25 कोटी
  • मुंबईतील एकूण कुटुंबांची संख्या : 25-30 लाख
  • झोपडपट्ट्यांत राहणारी कुटुंब : सुमारे 12 लाख
  • जुन्या इमारतींमध्ये राहणारी कुटुंब : सुमारे 5 लाख
  • सहकारी संस्थांमध्ये राहणारी कुटुंब : सुमारे 8 लाख

याचाच अर्थ मुंबईत सध्याच्या परिस्थितीत परवडणार्‍या साधारणत: 45 लाख घरांची आवश्यकता आहे.  बिल्डरधार्जिण्या धोरणांमुळे परवडणारी घरं होणं शक्यच नाही अस स्पष्ट मत चंद्रशेखर प्रभू यांनी व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी परवडणार्‍या घर बांधण्याचे आदेश दिले खरे पण यावर सहज विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती मात्र निश्चित नाहीयं. हा विश्वास मुख्यमंत्री आपल्या कृतीद्वारे मुंबईकरांना देतील का? याचं उत्तर फक्त मुख्यमंत्रीच देऊ शकतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close