राहुल गांधीसुद्धा देशद्रोही, त्यांना गोळ्या घाला- भाजप आमदार

February 18, 2016 2:06 PM0 commentsViews:

sdlashdjay

18 फेब्रुवारी : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील(जेएनयू) देशविरोधी घोषणाबाजी करणार्‍या विद्यार्थ्यांची बाजू घेणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे सुद्धा देशद्रोही असून, त्यांना गोळ्या घालून ठार केलं पाहिजे, असं विधान राजस्थानातील भाजपचे आमदार कैलाश चौधरी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘जेएनयू’ वादावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी केल्यामुळे विद्यापीठाच्या विद्याथच् संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार सध्या अटकेत असून, त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या वादात राजकीय नेत्यांनी उडी घेतल्याने हे प्रकरण चांगलेच गाजले आहे. राहुल गांधी यांनी विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनी राहुल यांच्यावर जोरदार टीका केली.

दहशतवादी अफझल गुरूचा उदोउदो करत देशविरोधी घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांची भेट घेऊन राहुल गांधी यांनी देशद्रोह केला आहे. त्यामुळे त्यांना फासावर लटकावले पाहिजे तसंच यांना सरळ गोळयाच घातल्या पाहिजे, असं धक्कादायक कैलाश चौधरी यांनी केलं. त्यांच्या या विधानाचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close