अल्पवयीन मुलांना सिगारेट विकणार्‍या पान टपरीवाल्याला अटक

February 18, 2016 5:31 PM0 commentsViews:

mumbai_pantapriमुंबई – 18 फेब्रुवारी : अल्पवयीन मुलांना सिगारेट विकणार्‍या एका पान टपरीवाल्याला पोलिसांनी अटक अटक केली आहे. नव्या तरतूदीनुसार करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे.

माटुंग्यातल्या डॉन बॉस्को इंटरनॅशनल शाळेजवळ हे दुकान असून मनीराम चौरसिया असं या विक्रेत्याचं नाव आहे. या दुकानात मुलांना सिगारेट विकल्या जातात अशी माहिती एफडीएला मिळाली होती. त्यांनी पोलिसांना माहिती देवून सापळा रचला आणि त्याचं मोबाईलवर चित्रिकरण केलं. त्या आधारावर पोलिसांनी मनिरामला अटक केलीय. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवन करणार्‍यांमध्ये अल्पवयीन मुलाचे प्रमाण अर्धे असल्यानं केंद्र सरकारनं कायद्यात बदल करत नवे कलम आणले आहे. पूर्वी तो गुन्हा अदखलपात्र होता आता तो दखल पात्र करण्यात आलाय. या नव्या तरतूदीनुसार करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे. अशा कारवाईंमुळे विक्रेत्यांना जरब बसेल असं पोलिसांचं म्हणणं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close