…म्हणून ‘फ्रीडम 251’ची वेबसाईट क्रॅश

February 18, 2016 6:14 PM0 commentsViews:

नवी दिल्ली -18 फेब्रुवारी : दिल्लीतील रिंगिंग बेल या मोबाईल उत्पादक कंपनीने ‘फ्रीडम 251′ या सर्वांत स्वस्त स्मार्टफोनचं लाँचिंग केलं. विशेष म्हणजे या फोनची किंमत फक्त 251 रुपये एवढीच आहे. मर्यादित स्टॉक असलेल्या या फोनसाठी आजपासून नोंदणी करता येत आहे. मात्र बुकिंग सुरू होताच वेबसाईट क्रॅश झाल्यामुळे यूजर्समध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.freedome phone

दिल्लीमध्ये संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या फोनचे अनावरण केलं. ऑनलाइन सेलमध्ये खरेदी करणार्‍या ग्राहकांना 30 जूनपर्यंत फोनची डिलेव्हरी देण्यात येणार आहे. 3जी ड्युएल सिम असलेल्या या फोनच्या एंट्रीने मोबाईल बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.
इतक्या स्वस्तातील फोनमुळे अँड्रॉइड ऍप्सवरील मनोरंजनाचा खजिना आता प्रत्येकासाठी खुला होणार आहे. या फोनमध्ये वुमन सेफ्टी, स्वच्छ भारत यांसारखी अनेक ऍप्स प्रीलोडेड असून, एक वर्षांची वॉरंटी आहे. कंपनीची 650 सर्व्हिस सेंटर आहे. फ्रीडम 251 साठी रिंगिंग बेल या कंपनीने www.freedom251.com ही स्वतंत्र वेबसाइट सुरू केली आहे.

आज गुरुवारपासून मोबाईल विक्रीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली. पण, पहिल्याच दिवशी वेबसाईट क्रॅश झाली. प्रत्येक सेकंदाला या वेबसाईटला सहा लाख युझर्स भेट देत आहे त्यामुळे ही वेबसाईट क्रॅश झालीये असा दावा या कंपनीने केलाय. प्रत्येक वेबसाईटचं सर्व्हर असतं. ज्या ज्या वेळी कुणी वेबसाईटला भेट असतं त्या त्या वेळी वेबसाईट आणि सर्व्हरमध्ये डाटाची देवाणघेवाण होते. जर यावर अतिरिक्त ताण पडला तर वेबसाईट क्रॅश होत असते. यासाठी सर्व्हेरवर बँण्डविथ फ्री ठेवावं लागतो जेणे करून वेबसाईट क्रॅश होत नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close