अवैध होर्डिंग्ज प्रकरणी कोर्टाने आशिष शेलारांना फटकारले, ‘नाम’ला मदत करण्याचे दिले आदेश

February 18, 2016 7:36 PM0 commentsViews:

ashish shelarमुंबई – 18 फेब्रुवारी : अवैध होर्डिग्ज प्रकरणी मुंबई हायकोर्टाने भाजपचे नेते आशिष शेलार यांना फटकारले. होर्डिंग्जबाजी करणार्‍या कार्यकर्त्यांवर कारवाई न केल्यामुळे कोर्टाने आशिष शेलार यांना होर्डिंग्जचे अर्धे पैसे भरण्याचे आदेश दिले आहे. तसंच होर्डिंग्ज लावल्याबद्दल शेतकर्‍यांना मदत करणार्‍या ‘नाम’ या संस्थेला मदत करावी असा आदेशही हायकोर्टाने दिले आहे.

अवैध होर्डिंग्ज प्रकरणी होर्डिंग्ज लावलेल्या कार्यकर्त्यांविरोधात कोणती कारवाई केली अशी विचारणा केली असता शेलार यांच्या
वकिलांनी कार्यकर्त्यांना समज दिली असल्याचं सांगितलं. पण त्यावर कोर्टाने समज नाही तर कारवाई काय केली ते सांगा असं म्हणत फटकारले. शेलार यांच्या वकिलांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात काय कारवाई केली याचा उल्लेख केल्या नसल्याबद्दल कोर्टाने चांगलंच फटकारले.

अशी होर्डिंग्ज लावल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी माफी मागितली. होर्डिंग्ज लावल्याबद्दल शेतकर्‍यांना मदत करणार्‍या ‘नाम’ या संस्थेला मदत करावी असा आदेश हायकोर्टाने दिले आहेत. 7 कार्यकर्त्यांनी प्रत्येकी 20 हजार ज्यातले प्रत्येक कार्यकर्त्याचे 20 पैकी 10 हजार रुपये आशिष शेलार यांनी द्यायची आहे. जमा झालेल्या 1 लाख 40 हजारांपैकी 25 हजार मनपाला द्यायचे आहेत. बाकीची रक्कम नाम संस्थेला द्यायची आहे. आशिष शेलार हे त्यांच्या स्टेटसला योग्य रक्कम द्यावी असे आदेश कोर्टाने दिले आहेत. भाजप, मनसेला देखील अशाच पद्धतीनं त्यांनी डिमांड ड्राफ्ट द्यावा असा आदेश हायकोर्टाने दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close