‘मेक इन इंडिया’त महाराष्ट्राच्या वाट्याला 10 लाख कोटींचे करार

February 18, 2016 9:02 PM0 commentsViews:

मुंबई – 18 फेब्रुवारी : हा आठवडा मेक इन इंडियाचा होता. मुंबईमधल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मेक इन इंडिया संकुलात भारताची आणि महाराष्ट्राची औद्योगिक ताकद बघायला मिळाली. त्याचबरोबर मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या कलादालनानेही सगळ्यांना भुरळ घातली. या प्रदर्शनात नवनवीन संशोधन, निमिर्ती आणि कल्पकतेचा संगम पाहायला मिळाला. मेक इन इंडिया ही परिषदेत राज्यासाठी फायद्याची ठरली आहे. गेल्या चार दिवसांत या परिषदेच्या माध्यमातून जवळपास 9 लाख 94 हजार कोटींचे गुंतवणुकीचे करार झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

makeinindia_mahaपंतप्रधानांच्या उपस्थितीत तीन सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. यामध्ये व्टिन स्टार टेक्नॉलॉजी, कोकाकोला आणि रेमंड इंडस्ट्रिज यांचा समावेश आहे. व्टिन स्टार टेक्नॉलॉजी (वेदांत ग्रुप) मराडवाडा किंवा विदर्भ येथे वस्त्रोद्योग प्रकल्प उभारणार आहे. कोकाकोला संत्रा उत्पादनासाठी प्रयत्नशिल असून नागपूर आणि अमरावती येथे संत्र्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. रेमंड इंडस्ट्रिज कंपनी नागपूर येथे एकात्मिक वस्त्रोद्योग प्रकल्प उभारणार आहे.

तर मेक इन इंडिया सप्ताहात राज्य शासनाने 2594 सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या. या कराराव्दारे 7.94 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे तीस लाख रोजगार निर्मिती होणार आहे. 2594 पैकी 2097 सामंजस्य करार मध्यम, लघु आणि लहान उद्योजकांशी करण्यात आले. तर 20 सामंजस्य करार कौशल्य विकासाच्या क्षेत्रात करण्यात आले. उर्वरित सामंजस्य करार उत्पादन, माहिती तंत्रज्ञान सेवा, वस्त्रोउद्योग, अन्न प्रक्रिया, वाहन उद्योग, संरक्षण, ऊर्जा या क्षेत्रातील आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक पायाभूत सुविधा, गृह, रेल्वे, बंदरे आणि कृषी या क्षेत्रातही सामंजस्य करार करण्यात आले.

‘मेक इन इंडिया’त महाराष्ट्राच्या वाट्याला
 
राज्यासाठी 9 लाख 94 हजार कोटींचे सामंजस्य करार
मराठवाडा आणि विदर्भ – 1 लाख 50 हजार कोटींचे सामंजस्य करार
खान्देश विभाग – 25 हजार कोटींचे सामंजस्य करार
कोकण आणि मुंबई – 3 लाख 25 कोटींचे सामंजस्य करार
पुणे विभाग – 50 हजार कोटींचे सामंजस्य करार

मेक इन इंडिया सप्ताहात 102 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग
8 लाख 90 हजार लोकांनी दिली भेट
115 कंपन्याचे स्टॉल्स
भारतीय कंपन्यांच्या 9 हजार प्रतिनिधींचा सहभाग
विदेशी कंपन्यांच्या 2 हजार प्रतिनिधींचा सहभाग

असे झाले करार
* स्मार्ट सिटी, हवाई रुग्णवाहिका, उद्योग, परडवडणारी घरे या क्षेत्रांसाठी एकूण 18 करार
* नवी मुंबईतील खालापूर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी करार
* नैना प्रकल्पात गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी 11 बांधकाम व्यावसायिकांसोबत करार
* सिडकोच्या कारभारात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशानं ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल संस्थेशी करार
* हवाई रुग्णवाहिकेकरिता राज्य सरकार आणि मॅब ऍव्हिएशनमध्ये सामंजस्य करार

 6 कंपन्यांसोबत करार

- फ्युचर ग्रुप – 850 कोटी
- ट्रेंट हायपर मार्केट – 400 कोटी
- डी मार्ट – 250 कोटी
- मेजर ब्रँडल – 50 कोटी
- मेट्रो शूज – 50 कोटी
- शॉपर्स स्टॉप – 30 कोटी
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close