विधानभवन, आमदार निवासांची सुरक्षा वार्‍यावर

March 10, 2010 10:32 AM0 commentsViews: 10

आशिष जाधव आयबीएन लोकमत, मुंबई10 फेब्रुवारीराज्याचे विधान भवन आणि चारही आमदार निवास असुरक्षित असून ते सॉफ्ट टार्गेट आहेत, असा धक्कादायक अहवाल पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. विधिमंडळाला अहवालमुंबईच्या वैभवात भर टाकणारी भव्य वास्तू म्हणजे विधानभवन. या वास्तूमध्ये राज्याचे विधिमंडळ वसले आहे. पण ही वास्तू सुरक्षित नाही. तर राज्यातील 367 आमदारांचे निवासस्थान असलेल्या चारही आमदार निवासांची सुरक्षाव्यवस्था फारच वाईट आहे असा अहवाल पोलिसांनी विधिमंडळाला दिला आहे.पुरेसा सिक्युरिटी स्टाफ नाहीपोलिसांच्या अहवालानुसार विधानभवनाकडे पुरेसा सिक्युरिटी स्टाफ नाही. जो स्टाफ आहे त्यांना योग्य प्रशिक्षण नाही.तसेच त्यांच्याकडे आधुनिक हत्यारे नाहीत. येथील सीसीटीव्ही यंत्रणा आणि मेटल डिटेक्टर्स जुनाट झाले आहेत.केवळ 18 पोलीस मनोरा, मॅजिस्टीक, ओल्ड कॉन्सिल हॉल आणि आकाशवाणी या चारही आमदार निवासांची सुरक्षाव्यवस्था केवळ नावाला आहे.या चारही ठिकाणांची सुरक्षाव्यवस्था 18 बिगर हत्यारी पोलीस आणि 31 खाजगी सुरक्षा रक्षकांच्या हातात आहे, असे अहवालात म्हटले आहे.पोलिसांनीच विधानसभवन आणि आमदार निवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केल्याने राज्यसरकार खडबडून जागे झाले आहे.विधानसभवनात एक्स-रे स्कॅनर्स दिल्लीतल्या संसद भवनाप्रमाणेच आता विधानसभवनात एक्स-रे स्कॅनर्स आणि लिक्विड एक्सप्लोझिव्ह डिटेक्टर्स बसवण्यात येणार आहेत. तसेच सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. विधानसभवनात येणार्‍यांना फोटो आयडेंटी कार्ड आणि बायोमेट्रीक डेटा द्यावा लागणार आहे. यासोबतच अधिवेशनाच्यावेळी पोलिसांसुद्धा विधानभवनात तैनात केले जाणार आहे.मंत्र्यांची वाहनेही विधानभवनाबाहेर ठेवली जाणार आहेत. तसेच मंत्र्यासोबत एकाच पीएला आत सोडले जाणार आहे.विधानभवनासोबतच चारही आमदार निवासांच्या सिक्युरिटी स्टाफमध्ये वाढ केली जाणार आहे.

close