मोहमद युसूफ, युनूस खानवर आजीवन बंदी

March 10, 2010 10:44 AM0 commentsViews: 2

10 फेब्रुवारीऑस्ट्रेलियातील पराभवाचा पाकिस्तान टीमला चांगलाच फटका बसला आहे. मोहमद युसूफ आणि युनूस खानवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर पाकिस्तान टीमच्या खराब कामगिरीची चौकशी करण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. आणि त्याच चौकशी समितीच्या सल्ल्यानुसार पीसीबीने खेळाडूंवर अखेर कारवाई केली आहे. मोहम्मद युसुफ आणि युनिस खानवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. तर ऑल राऊंडर शोएब मलिक आणि राणा नावेदवर एका वर्षाची बंदी तसेच 20 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर शाहीद आफ्रिदी, कामरान अकमल आणि ओमर अकमल यांना शेवटची सक्त ताकीद देण्यात आली आहे.

close