‘देव तारी…’,डोक्यात आरपार रॉड घुसूनही तरुण सुखरूप बचावला

February 18, 2016 10:43 PM0 commentsViews:

malad_hospital4मुंबई -18 फेब्रुवारी : ‘देव तारी त्याला कोण मारी’ असं म्हटलं जात आणि याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. मुंबईत एका तरुणाच्या डोक्यात आरपार रॉड घुसला होता पण डॉक्टरांनी प्रयत्नाची पराकाष्टा करत या तरुणाला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढलं.

मालाड परिसरात काम करताना मोहम्मद गुड्डू या मजुराच्या डोक्यात तब्बल 7 फुटांचा लोखंडी रॉड घुसला होता. हा रॉड गुड्डूच्या डोक्यातून आरपार गेला. त्याच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव सुरू झाला. त्याला तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण गुड्डूची परिस्थिती पाहता त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना डॉक्टरांनी दिली. गुड्डूवर सायन हॉस्पिटलमध्ये न्यूरो सर्जन बुटिक डियोरानी तब्बल पाच तास शस्रक्रिया केली. आणि त्याला अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परत आणलं. गुड्डूला जीवदान मिळेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण डॉक्टरांनी सळई बाहेर काढली आणि एक अतिशय अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close