राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माणिकराव पाटील

March 10, 2010 10:52 AM0 commentsViews: 3

10 फेब्रुवारी राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माणिकराव पाटील यांची सलग तिसर्‍यांदा निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब सरनाईक यांची सलग दुसर्‍यांदा निवड झाली आहे. राज्यातील सर्व सहकारी बँकांची शिखर बँक असलेल्या या राज्य बँकेच्या सर्व संचालकांची एक बैठक काल रात्री शरद पवार यांनी घेतली. शरद पवारांनी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जलसंपदामंत्री अजित पावर, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आणि इतर ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर माणिकराव पाटील आणि बाळासाहेब सरनाईक यांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी त्याची औपचारिक घोषणा करण्यात आली.

close