छत्रपती शिवाजी महाराजांची आज तारखेनुसार जयंती

February 19, 2016 8:49 AM0 commentsViews:

 Shivjayanti213

पुणे – 19 फेब्रुवारी : तब्बल 400 वर्षांपासून महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयावर विराजमान असलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्ताने किल्ले शिवनेरी आज शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडतोय. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे आणि गृहराज्यमंत्री राम शिंदे उपस्थित आहेत.

शिवनेरी गडावरच्या शिवाई देवीच्या अभिषेकाने शिवजन्म महोत्सवाला सुरवात झाली आहे. तर पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला आहे. त्यानंतर शिवाई देवी मंदिर ते शिवजन्मस्थान पालखी मिरवणूक काढण्यात आली.

दरम्यान राज्यभरातील शिवप्रेमी किल्यांवर गर्दी करू लागले असून जन्मसोहळ्यास फक्त पास धारकाना प्रवेश देण्यात आल्याने सामान्य शिवप्रेमीनी नाराजी व्यक्त केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close