पठाणकोट हल्ल्याप्रकरणी मसूद अझरवर एफआयआर दाखल करा – पाक सरकार

February 19, 2016 12:40 PM0 commentsViews:

terrorist-operation-perimeter-responsible-suspected-pathankot-following_f9add8fa-b2f4-11e5-9860-1d91036943d1

19 जानेवारी : पठाणकोट हल्ल्याप्रकरणी मौलाना मसूद अझरवर एफआयआर दाखल होणार आहेत. पाकिस्तान सरकारनं याबाबतचे आदेश दिले आहेत. पाक सरकारनं या हल्ल्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली होती. त्या समितीनं मौलाना मसूद अझर याच्यासह आणखीन काही जणांवर एफआयआर दाखल करा, अशी शिफारस केली आहे. त्या आधारावर पाक सरकारनं हा आदेश दिला आहेत.

पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदवर कारवाई करावी, यासाठी भारताने दबाव वाढवला होता. पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर दोन जानेवारीला दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात भारताचे 7 जवान शहीद झाले होते. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हल्ल्याबाबत पाकिस्तानला महत्त्वाचे पुरावे सोपवले होते. त्याचाही उपयोग झालेला दिसतोय. त्यामुळे मौलाना मसूद अझरवर कारवाई करण्यासाठी पाकला भाग पाडण्यास केंद्र सरकारला यश आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close