मद्यनिर्मितीविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली

March 10, 2010 11:06 AM0 commentsViews: 1

10 फेब्रुवारी धान्यापासून मद्य निर्मिती करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. सरकारच्या कामात कोर्ट हस्तक्षेप करणार नाही असे हायकोर्टाने याबाबत म्हटले आहे.सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते चेतन कांबळे यांनी केली होती. सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी नागपूर अधिवेशनात सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. तर काही दिवसांपूर्वीच सरकारच्या या निर्णयाबाबत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, चंद्रशेखर धर्माधिकारी, अभय बंग यांनीही याबाबत सरकारला पत्र लिहिले होते.धान्यापासून मद्यनिर्मिती करणारे बहुतेक प्रकल्पांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांचेही हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे या निर्णयाला होणार्‍या विरोधाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही होत आहे. पण आता हायकोर्टाच्या निर्णयामुळे सरकारला बळच मिळणार आहे.

close