भूमाता ब्रिगेडचा त्र्यंबकेश्वर मंदिराकडे ‘मोर्चा’, मंदिरात महिलांना प्रवेश द्या !

February 19, 2016 4:56 PM0 commentsViews:

bhumata_brigade2नाशिक – 19 फेब्रुवारी : शनी मंदिराच्या आंदोलनानंतर आता भूमाता ब्रिगेडने त्र्यंबकेश्वर मंदिराकडे मोर्चा वळवलाय. त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश मिळावा अशी मागणी भूमाता ब्रिगेडने केलीये.

त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या गाभार्‍यातही महिलांना प्रवेश मिळावा, अशी एक नवी मागणी भूमाता ब्रिगेडनं केलीये. काशी विश्वेश्वराच्या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जातो. तर मग त्र्यंबकेश्वरमध्ये का नाही, असा सवाल देसाई यांनी पत्रक काढून केलाय.

महाशिवरात्रीच्या आधी याबाबत निर्णय घेण्यात यावा नाहीतर महिला मंदिरात प्रवेश करतील असा इशाराही देसाई यांनी दिलाय. याआधीही भूमाता ब्रिगेडने शनी मंदिराच्या चौथर्‍यावर जाण्याचा प्रयत्न केला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close