फूटपाथ अपघात प्रकरणाची सुनावणी झाली पाहिजे, सुप्रीम कोर्टाची सलमानला नोटीस

February 19, 2016 5:07 PM0 commentsViews:

salman cryनवी दिल्ली – 19 फेब्रुवारी : फूटपाथ अपघात प्रकरणी अभिनेता सलमान खानला सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी सुनावणी झाली पाहिजे असं मत नोंदवत यासंदर्भात कोर्टाने सलमान खानला नोटीस पाठवली आहे. तसंच या नोटीसीला सलमानने 6 आठवड्याच्या आत उत्तर देणे अपेक्षित आहे.

फुटपाथ अपघात प्रकरणी सलमान खानला मुंबई न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता दिलीये. या प्रकरणी राज्य सरकारने या सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने सलमानला नोटीस पाठवली आहे.

या प्रकरणाची सुनावणी झाली पाहिजे असं मत कोर्टाने नोंदवलंय. आता सलमानला सहा आठवड्याच्या आता याचे उत्तर द्यायचे आहे. मुंबई सत्रन्यायालयात सलमानच्या वकिलांनी सलमान खान अपघाताच्या वेळी गाडी चालवत नव्हता असा युक्तीवाद केला होता. सलमान खान अपघाताच्या वेळी गाडी चालवत होता असा कोणताही पुरावा कोर्टात सादर करता आला नाही. त्यामुळे सलमानआधी सत्रन्यायालयाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती त्या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close