‘लालबाग परळ’चे दिमाखदार लाँचिंग

March 10, 2010 11:26 AM0 commentsViews: 62

10 फेब्रुवारीकापड गिरण्या आणि मुंबईचा इतिहास आजच्या तरूण पिढीला नव्याने सांगता यावा यासाठी आता महेश मांजरेकर एक मराठी सिनेमा घेऊन येत आहेत. मंगळवारी रात्री मुंबईतील कामगार मैदानावर हजारो गिरणी कामगारांच्या साक्षीने महेश मांजरेकरांनी 'लालबाग परळ' या आपल्या सिनेमाचे लाँचिंग केले. 1982 चा काळ जो लालबाग परळ मधील कापड गिरण्यांच्या संपामुळे गाजला होता. त्यामध्ये अनेक कामगारांचे झालेले हाल त्यांच्या गेलेल्या नोकर्‍या, त्यांची फरफट यावरचा लालबाग परळ हा सिनेमा हजारो गिरणी कामगारांच्या साक्षीने महेश मांजरेकरांनी मुंबईत लाँच केला. या सिनेमाचे संवाद ज्येष्ठ नाट्य समीक्षक जयंत पवार यांनी लिहिले आहेत. आणि सिनेमाला डायरेक्टर टच आहे महेश माजंरेकरांचा.या सिनेमात मुख्य भूमिका केलीय ती सिध्दार्थ जाधवने. त्याचे या सिनेमातील कॅरेक्टरचे नाव आहे, स्पीडब्रेकर. सिध्दार्थसोबतच बॉलिवूड अभिनेत्री सीमा विश्वास आणि सतीश कौशिक यांच्याही यात भूमिका आहेत.या कार्यक्रमाला मराठी तारकांसोबतच अनेक गिरणी कामगार आणि कामगार नेते उपस्थित होते. 'ज्यांना आम्ही वस्त्रे दिली त्यांनीच आम्हाला निर्वस्त्र केले' असे सिनेमाच्या टॅगलाईनमध्येच म्हटले आहे.

close