कसा झाला तुमचा रेल्वे प्रवास ?, सांगा आम्हाला आणि पाठवा सेल्फी !

February 19, 2016 8:39 AM0 commentsViews:

Railway budget 2016 (34)19 फेब्रुवारी :

गरिबांचा रथ म्हणून गेल्या अनेक दशकांपासून सर्वसामान्यांच्या दिमतीला असलेल्या रेल्वेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प आता लवकरच सादर होणार आहे. जीवाभावाच्या या रेल्वेत दररोज लाखो प्रवासी दिवसदिवसभर प्रवास करता. मुंबईकर तर दिवसातले दोन-तीन तास लोकल प्रवासात काढतात.

पण, एवढं करूनही तुमच्या वाट्याला काय येतं ?, अस्वच्छ रेल्वे स्थानकं, बे-टाईम धावणार्‍या गाड्या…आणि जीवघेणा लोकलचा प्रवास…म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो #प्रभूएक्स्प्रेस…

तुम्हाला एवढंच करायचंय…तुम्ही जर रेल्वे,लोकल,मेट्रो किंवा मोनो रेल्वेनं प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव आम्हाला सांगा…तुमचा अनुभव तुम्ही ट्विटरवर ट्विटकरून आम्हाला @ibnlokmattv टॅग करा आणि वापरा हॅशटॅग #प्रभूएक्स्प्रेस…सोबत तुमचा सेल्फी पाढवायचं विसरू नका…चला तर मग सेफ प्रवासासाठी करूया ट्विट…

तुम्हाला फक्त एवढंच करायचं…

- समजा, तुम्ही जर डोंबिवली ते दादर असा लोकलने प्रवास केला असेल
– तर या तासाभराच्या प्रवासातला अनुभव किंवा सेल्फी आम्हाला पाठवा
– मेसेज पाठवण्यासाठी ट्विटरचा वापर करा आणि ट्विट करा सोबत सेल्फीही पाठवा
– #प्रभूएक्स्प्रेस हा हॅशटॅग वापरण्याचं विसरु नका
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close