म्हाडाची मे महिन्यात मुंबईसाठी 1050 घरांची मेगालॉटरी

February 19, 2016 8:30 PM0 commentsViews:

mahada323मुंबई -19 फेब्रुवारी : मुंबईत घर हवं आणि ते ही खाजगी बिल्डरांच्या तुलनेत कमी पैशात असं स्वप्न पाहणार्‍यांसाठी खुशखबर आहे. म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठी होणार्‍या लॉटरीत तब्बल1050 घरं असणार आहे. मे महिन्यात ही मेगालॉटरी निघणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हाडाने मुंबईत घर घेण्यार्‍यांसाठी मे महिन्यात लॉटरी सोडत आणली आहे. मुंबईत यंदा 1050 घरांसाठी
गोरेगाव, मुलुंड, कुर्ला, दहिसर या चार ठिकाणी लॉटरीची सोडत निघणार आहे. दरवर्षीप्रमाणेच या घरांसाठी 31 मेला लॉटरीची सोडत जाहीर होईल. आणि त्यासाठी एप्रिल महिन्यात अर्ज मागवले जाणार आहे. ज्यांना या घरांसाठी अर्ज करायचेत त्यांनी आताच तयारीला लागलं पाहिजे. कारण अर्जासोबत भरावी लागणारी अनामत रक्कम ही ऐनवेळी जमा करणं अनेकांना कठीणं जातं. त्यामुळे म्हाडाच्या घराचं स्वप्न पाहणार्‍यांसाठी पुन्हा एकदा नामीसंधी उपलब्ध तयार झालीये.

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close