वय वर्ष 7 आणि पठ्‌ठ्याने केले 52 गड-किल्ले सर !

February 19, 2016 9:11 PM0 commentsViews:

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड, 19 फेब्रुवारी : वयाच्या 7 वर्षी तुम्ही काय केलं होतं ?असा प्रश्न कुणी विचारला तर आपल्यापैकी अनेकांना त्याच फार विशेष उत्तर देता येणार नाही, पण पिंपरी चिंचवड़ मधील एक 7 वर्षांचा चिमुकला याला अपवाद ठरलाय. या पठ्याने एवढ्या लहान वयात 1 नाही, 2 नाही तर तब्बल 52 गड़-किल्ले सर केले आहेत जाणून घेऊया या छोट्या “किल्लेदाराचा” प्रवास…

anirudhapatil1हा आहे अनिरुद्ध पाटील…मूर्ती अगदीच लहान पण कीर्ती खरंच महान..अवघ्या सात वर्षांच्या या चिमुरड्या ट्रेकरने भीमपराक्रम केला आहे. हा पराक्रम बोलायला जेवढ सोपा वाटतो तेवढाच करण्यासाठी अवघड आहे आणि अनिरुद्धच्या वयात करणे तर त्यापेक्षाही
अशक्य…कारण आता राज्यातील सर्वच गड़ किल्यांची बुरुज अशी ढसाळलेली आहेत. किल्ल्यांवर जाण्यासाठी ना नीट वाट आहे,ना सुरक्षेचे कोणत्या उपाय योजना. पण तरीही अनिरुद्धने,केवळ त्याच्यात असलेल्या अमाप उत्साह आणि जिद्दीच्या जोरावर अश्या मोहिमा लीलया फत्ते केल्या…

कमालीचा लाघवी स्वभाव तसंच आवाज आणि डोळ्यातील मिश्किल भाव, ओठांवरील निरागस हास्य यामुळे तो समोरच्याच्या काळजालाच हात घालतो. अनुभवी गिर्यारोहकांचेही पाय लटपटू लागतात. अशा ठिकाणी हे पिल्लू अत्यंत सराईतपणे वावरतं. भीती हा शब्द त्याला माहीतच नसावा. धडाडी जितकी तितकाच गोड निरागसपणाही उपजत आहे. स्टॅमिना म्हणाला तर अत्यंत अनुभवी ट्रेकरला देखील लाजवणारा…अनिरुद्ध किल्ले तर सर करतोच त्याचबरोबर हां पट्ठा सराईत गिर्यारोहक ही आहे ,आत्ता पर्यंत तब्बल 25 वेळा गिर्यारोहन करून राज्यातील सर्वात छोटा गिर्यारोहक असल्याची ओळखही अनिरुद्ध ने कायम केलीय.

anirudhapatil3या छोट्या चिमुरड्याने एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे स्वप्नही उराशी बाळगलंय. गिरीभ्रमणात जोखीम असली तरी आवश्यक ती दक्षता घेतली तर त्यासारखा दुसरा कोणताही आनंद नाही. सात वर्षांचा छोटा अनिरुद्ध आणि त्याला गिर्यारोहणासाठी प्रोत्साहन देणारे त्याचे आई-वडील हे समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत. अनिरुद्ध या छोट्या गिर्यारोहकाचा आदर्श घेऊन महाराष्ट्रात अनेक बालगिर्यारोहक सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये पहायला मिळतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close