लाठीमाराची चौकशी अजूनही नाहीच

March 10, 2010 11:35 AM0 commentsViews: 1

10 फेब्रुवारीवसईच्या लाठीमाराची अजूनही चौकशी झालेली नाही. मात्र या प्रश्नावर मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विवेक पंडित यांची बैठक होणार आहे.वसईकरांनी केलेले आंदोलन पोलिसांच्या अमानुष क्रौर्यामुळे वेगळ्या वळणावर गेले. सरकारचा मनमानीपणा…लोकांचे शांततेच्या मार्गाने चाललेले आंदोलन…पोलिसांची ठोकशाही आणि सरकारची ढिम्म भूमिका…वसईकरांचा आवाज प्रसारमाध्यमांनी मांडल्यावर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. मात्र पुढे त्याचे काय झाले? या प्रकरणी कोणावर ठपका ठेवला गेला? आणि दोषी पोलिसांवर सरकार काय कारवाई करणार ? या सर्व प्रश्नांची उत्तरे अजून बाकी आहेत. मुख्यमंत्री आणि पंडित यांच्या बैठकीत कारवाई चर्चा होईल, अशी वसईकरांची अपेक्षा आहे.

close