मुस्लिम तरुणांची शिवजयंती

February 19, 2016 10:01 PM0 commentsViews:

जळगाव – 19 फेब्रुवारी :  आज महाराष्ट्रासह देश भरात शिवाजी महाराजांची जयंती साजरी होतेय. भुसावळच्या मुक्ताईनगरमध्ये पहिल्यांदाच मुस्लिम विद्यार्थांनी मिरवणूक काढून जल्लोषात शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभाव मानणारे होते असा बहुजनांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची मुस्लिम विद्यार्थांनी जयंती साजरी करून एकात्मतेचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

मुक्ताईनगरच्या अल फराह वेलफेअर एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं या जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. मुक्ताईनगरमधून मिरवणूक काढत या सोहळ्याला प्रारंभ झाला. या सोहळ्यात अल्पसंख्याक अध्यक्ष मोहम्मद हुसेन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कुराणचं पठण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी मोहम्मद हुसेन यांच्या हस्ते समाजात उत्तुंग कामगिरी करणार्‍या व्यक्तींना शिव गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून हा सोहळा आयोजित केला असल्याचं मोहम्मद हुसेन म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close