दुष्काळाचा बळी, विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

February 20, 2016 2:02 PM0 commentsViews:

buldhana_232बुलडाणा – 20 फेब्रुवारी : पाण्यासाठी विहिरीत वाकून पाहतांना 12 वर्षांच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मेहकरमध्ये घडलीये.

बुलडण्यातल्या मेहकर तालुक्यात पाणी टंचाईमुळे एका चिमुकल्याचा बळी घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालाय. पाण्यासाठी वणवण करावी लागतीये. मेहकर तालुक्यातही विहिरींनी तळ गाठलाय. बोअरही आटले आहेत. मेहकर मधल्या महेश देवानंद शेजुळ या 12 वर्षांच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झालाय. पाणी आणण्यासाठी महेश विहिरीवर गेला होता.

या विहिरीत खोलपर्यंत पाणीच नव्हतं. पाण्यासाठी खाली वाकून बघत असताना महेशचा मृत्यू झालाय. पण याची अजूनही दखलच घेतली नाहीये. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच महेशचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. या गावात पाणीटंचाई असल्याचा प्रस्ताव गावकर्‍यांनी पाठवला होता. पण तरीही कोणत्याही अधिकार्‍यानं याची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे पाण्यापायी हकनाक महेशचा बळी गेलाय.त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close