गोविंद पानसरेंच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, मारेकरी अजूनही मोकाटच

February 20, 2016 12:09 PM0 commentsViews:

co govind pansare last rites (5)कोल्हापूर – 20 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण होतंय. पण मारेकरी अजूनही पकडले गेलेले नाहीत. याचा निषेध म्हणून आज कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी मॉर्निंग वॉक काढला.

सरकार आणि तपास यंत्रणांवर दबाव म्हणून कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मुलन समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या 3 दिवसीय बैठकीला कालपासून सुरुवात झालीये. राज्यातले अंनिसचे पदाधिकारी या बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत. 16 फेब्रुवारी 2015 ला पानसरे दाम्पत्य मॉर्निंग वॉकला गेले असता बाईकवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. पानसरे यांच्यावर कोल्हापूर हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. उपचार सुरू असतानाचं 20 तारखेला मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये कॉ.पानसरे यांचे निधन झालं. या प्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाडला अटक करण्यात आलीये. कोल्हापूर कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close