उल्हासनगरमध्ये उपायुक्तांवर हल्ला, हल्लेखोरांनी पेटवली कार

February 20, 2016 4:42 PM0 commentsViews:

ullashnagar_bhadane2मुंबई – 20 फेब्रुवारी : उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त युवराज भदाने यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांची कार पेट्रोल टाकून पेटवून दिलीये. धक्कादायक म्हणजे उल्हासनगर महापालिकेच्या कंपाऊंड परिसरातच हा प्रकार घडलाय. या हल्ल्यातून युवराज भदाने  बचावलेत, पण त्यांची गाडी जळून खाक झालीये.

आज सकाळी आपल्या खासगी गाडीतून भदाने त्यांच्या कार्यालयात पोहचले होते. तेव्हा दोन मोटरसायकलस्वार आले आणि त्यांनी
गाडीवर पेट्रोल टाकलं आणि गाडी पेटवून दिल्याचा प्रयत्न केला. अनधिकृत बांधकामांवरच्या कडक कारवाईमुळे भदाने कायमच चर्चेत आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्ले झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे गटनेते आणि नगरसेवक मनोज लासी यांच्यावर भदाने यांनी संशय व्यक्त केलाय. काही दिवसांपूर्वी आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचं भदाने यांनी सांगितलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close