विद्यापीठात तिरंगा लावण्याच्या निर्णयामुळे मुंबई आयआयटीतले प्राध्यापक नाराज

February 20, 2016 5:40 PM0 commentsViews:

iit_mumbai4मुंबई – 20 फेब्रुवारी : विद्यापीठांवर तिरंगा ध्वज लावण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहे. परंतु, मुंबईतील आयआयटी संस्थेतील प्राध्यापकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तिरंगा लावणे म्हणजे आयआयटी संस्थेच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखं आहे असं या प्राध्यापकचं म्हणणं असून त्यांनी मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना पत्रही लिहिलंय.

जेएनयू वादामुळे देशभरात याचे तीव्र पडसाद उमटले. या वादानंतर केंद्र सरकारने देशभरातील विद्यापीठांवर तिरंगा लावण्याचे आदेश जारी केले आहे. प्रत्येक विद्यापीठात 207 फूट उंचावर तिरंगा फडकला पाहिजे असा आदेशही यात देण्यात आलाय. पण, या आदेशाबाबत मुंबईतील आयआयटी विद्यापीठातील प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केलीये. आयआयटी मुंबईच्या काही प्राध्यापकांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणींना पत्र लिहिलंय. केंद्रीय विद्यापीठांवर 207 फुटांचा तिरंगा लावण्याच्या आदेशावर त्यांनी नाराजी व्यक्ती केली आहे असे आदेश म्हणजे आयआयटीसारख्या स्वायत्त संस्थांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखं आहे. देशप्रेमासारख्या भावना व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, असंही यात म्हटलंय. हे पत्र त्यांनी वैयक्तिक पातळीवर लिहिलंय, आयआयटीच्या वतीनं नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close