एक्स्प्रेस वेवर ट्रॅफ्रिक जॉम कॅमेर्‍यात कैद

February 20, 2016 6:04 PM1 commentViews:

पुणे – 20 फेब्रुवारी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जितका सुसाट तितकाच मनमोहक सुद्धा आहे. पण, आज या एक्स्प्रेस वे प्रचंड वाहतूक कोंडी झाल्यामुळे लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. या एक्स्प्रेस वेचं विहंगम दृश्य कॅमेर्‍यात कैद झालंय. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी एक्स्प्रेस वेवर कोंडीचा फोटो ट्विट केलाय. एक्स्प्रेस वेने जर कुणी प्रवास करत असेल तर टाळा असा असं आवाहनही त्यांनी केलं.
आज सकाळी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ऑइल टँकर पलटल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळंबा झाला होता. ही वाहतूक अजूनही धीम्या गतीने सुरू आहे. पाच किमी पर्यंत प्रचंड रांगा पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर आहेत. वाहनांच्या रांगा असल्याने ते ऑइल वॉश आउट करण्याचं काम चालू आहे. त्यातल्या त्यात विकेंड असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनाची गर्दी हायवेवर आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Vaibhav

    मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील ट्राफिक पाहता काही उपाय करण्याची गरज आहे.
    १ कोणत्याही वाहनधारका कडून लेनची शिस्त पाळली जात नाही शासकीय कर्मचार्याची याकडे होणारी टाळाटाळ.
    २ रस्त्याची दुरावस्ता (लेवल, निसरट)अश्या कारणाने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे अपघातास निमंत्रण देत आहे.

    ३ यावरती भूमिगत मार्गाची निर्मिती करून सोयीस्कर उपाय योजना करावी.

close