हिंगोलीत 5 मुलांचा संशयास्पद मृत्यू

March 10, 2010 2:03 PM0 commentsViews: 1

10 फेब्रुवारी हिंगोली जिल्ह्यातील दिग्रस गावात 5 मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाल आहे.कुरुंडा पोलीसस्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलांच्या मृत्यूचे कारण अजूनही समजू शकलेले नाही. व्हिसेरा चाचणीमध्येही त्यांना कोणत्याही प्रकारची विषबाधा वगैरे झालेले आढळले नाही. पोलिसांनी यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा यासंबंधी तपास करत आहे. दुसर्‍या पद्धतीनेही या घटनेचा तपास झाला पाहिजे, असे आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी म्हटले आहे. 13 डिसेंबर ते 4 मार्च या काळात या मुलांचा मृत्यू झाला होता.

close