जालन्यात पारधी शेतकर्‍याची गोळी घालून हत्या

March 10, 2010 2:11 PM0 commentsViews: 8

10 फेब्रुवारी शेतात जाण्यासाठी रस्ता मागणार्‍या पारधी समाजाच्या एका शेतकर्‍यांची गोळ्या घालून हत्या झाल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. अंबड तालुक्यातील रामगव्हाण इथे हा प्रकार घडला. वर्धमान पवार असे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. रामगव्हाण इथे पारधी समाजाची 7 घरे आहेत. 20 वर्षापूर्वी शासनाने पगाबाई पवार यांना 4 एकर जमीन दिली आहे. याच जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह होतो. मात्र शेतात जाण्यासाठी त्यांना रस्ताच नव्हता. यावरूनच त्यांचा शेजारी शेत असणारे भगवान नागरे यांच्याशी वाद होते. या वादातूनच नागरे याने गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून वर्धमान पवार यांची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

close