पुण्यात तेलाच्या व्यापार्‍याची हत्या

February 21, 2016 11:59 AM0 commentsViews:

CrimeScene2

पुणे – 21 फेब्रुवारी :  शिवाजीनगर परिसरातील तेलाचे व्यापारी नारायण हसानंद नागदेव (वय50) यांची घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नागदेव हे तेलाचे व्यापारी होते. शिवाजीनगर येथील मंगला टॉकीज परिसरात ते राहत होते. मध्यरात्री घरात घुसून त्यांची धारदार शस्त्राने वार करून आणि गळा दाबून हत्या करण्यात आली. घरातून सोन्याचे दागिने आणि दीड लाखाची रोकड गायब झाल्याचं आढळून आलं आहे. दरम्यान, या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच ही हत्या चोरीच्या हेतूने झाली की अजून वेगळं काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close