जाट आंदोलन : हरियाणात हिंसाचार सुरुच 10 ठार, 150 जखमी

February 21, 2016 6:02 PM0 commentsViews:

Jat Protest132

हरियाणा – 21 फेब्रुवारी : आरक्षणाच्या मागणीसाठी जाट समुदायाने सुरू केलेले आंदोलन आता अधिक चिघळत चाललं आहे. या आंदोलनामुळे रविवारीही हरयणात तणाव कायम असल्याचं चित्र आहे. आतापर्यंत या आंदोलनात 10 जणांचा मृत्यू झाला असून 150 जण जखमी झाल्याचं आहे. तिसर्‍यादिवशी ठिकठिकाणी रास्ता रोको, जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. राज्याच्या अनेक भागात हिंसाचार सुरू आहे. रोहतक, भिवानी, झज्जरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या गुडगावमधली परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तिथं पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. मात्र, सोनीपतमध्ये आजही बंद आहे, अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे, तसंच झाडं कापून रस्त्यावर टाकण्यात आली आहेत. तसंच इंटरनेट, एसएमएस सेवाही बंद आहेत.

दरम्यान, जिंदमध्ये आंदोलनकर्त्यांनी पेट्रोल पंपाची नासधूस केली. या हिंसाचारात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून, 150 जण जखमी झालं आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केलं. मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. जाट समुदायाचा आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी गेल्या आठवडाभरापासून हरयाणात जाटांचे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर आंदोलनाचे लोण पसरत गेलं. शनिवारीही आंदोलकांनी ठिकठिकाणी सरकारविरोधात घोषणा देत हिंसेचा मार्ग अवलंबला.

जाट आंदोलनाचा ठाण्यातील पर्यटकांना फटका 

जाट आंदोलनाचा फटका ठाण्यातील पर्यटकांना बसला आहे. ठाण्यातील जवळपास 60 पर्यटक चंदीगडमध्ये अडकले आहेत. आंदोलनामुळे चंदिगडमध्ये सध्या वाहतूक सेवा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे पर्यटक चंदिगड स्टेशनवरच अडकले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close