10 वर्षाच्या मुलाचा वडिलांवर खटला

March 10, 2010 2:51 PM0 commentsViews: 8

10 फेब्रुवारीकौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याखाली पुण्यातील 10 वर्षाच्या मुलाने त्याच्या वडिलांच्याच विरोधात खटला दाखल केला आहे. या खटल्यातील फिर्यादी मुलाच्या आई, वडिलांनी 2002मध्ये घटस्फोट घेतला. त्यावेळी ठरल्यानुसार मुलाचा ताबा आईकडे देण्यात आला. वडिलांनी दरमहा 500 रूपये पोटगी आणि मुलाच्या शिक्षणासाठीचा खर्च द्यावा, असा निर्णय फॅमिली कोर्टाने दिला. त्यानंतर या मुलाच्या आईने आणि वडिलांनीही दुसरे लग्न केले. दरम्यान वडिलांनी पोटगीचे दरमहा 500 रुपये तर दिले नाहीतच. शिवाय शिक्षणाचा खर्चही अनियमीतपणे दिला. तसेच यावरून त्यांनी सतत मला आणि माझ्या आईला अपमानित केले, असे या मुलाने त्याच्या अर्जात म्हटले आहे. आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल 2 लाख रुपये द्यावेत अशी मागणीही त्याने केली आहे.

close