पम्पोरमध्ये चकमकीत 5 जवान शहीद, 1 दहशतवाद्याला कंठस्नान

February 21, 2016 9:07 PM0 commentsViews:

pakistan ceasefire voilation

श्रीनगर- 21 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरमधील पम्पोर भागात सुरू असलेल्या दहशतवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत कॅप्टन पवन कुमार यांच्यासह पाच जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत एका नागरिकाचा देखील मृत्यू झाला आहे. भारतीय लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे.

या हल्ल्यानंतर सीआरपीएफने दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरू केलेली मोहिम अद्याप सुरू आहे. शनिवारी रात्री हे ऑपरेशन बंद करण्यात आलं होतं मात्र, सकाळपासून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पुन्हा सुरुवात करण्यात आली. आतापर्यत एका दहशतवाद्यास कंठस्नान घालण्यात यश आलं आहे.

दरम्यान, हल्लेखोर ईडीआय कंपनीत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर या कंपनीतील सर्व कर्मचार्‍यांना बाहेर काढण्यात आले. या इमारतीत तीन ते चार दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. त्यांची धरपकड करण्यासाठी लष्कराने संपूर्ण परिसर सील केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close