मार्चअखेरीस हार्बर मार्गावर 12 डब्यांची लोकल धावणार?

February 22, 2016 9:43 AM0 commentsViews:

habour railway block

मुंबई – 22 फेब्रुवारी : मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गवरील 72 तासांचा मेगाब्लॉक काल (रविवारी) मध्यरात्री यशस्वीरित्या पूर्ण झाला असून मार्च अखेरीस यावर 12 डब्यांच्या लोकल धावण्याची शक्यता आहे.

आज (सोमवारी) सकाळी या मार्गावरून नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे पहिली लोकल धावली. अधिकृतरित्या मेगाब्लॉक मध्यरात्री 1.30 वाजता जरी संपला असला तरी, चारशेहून अधिक कामगार आणि 80 अभियंत्यांनी केलेल्या अविरत कामामुळे बहुतांश काम रविवारी संध्याकाळीचं पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी दिली. तसंच, शिल्लक राहिलेली लहान-मोठी कामं येत्या 35 दिवसांत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रेल्वे प्रशासनाने 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान हा मेगाब्लॉक घेतला होता. यामध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस इथल्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनची लांबी वाढवणं, रेल्वे रुळांचं दुभाजक (क्रॉसओव्हर) बदलणं, ओव्हरहेड वायरचे काम करणे, स्टेबलिंग लाईन हटवणे अशी विविध कामं पूर्ण केली आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close