वसईतील 53 गावांबाबत अधिवेशनापूर्वी निर्णय

March 10, 2010 5:06 PM0 commentsViews: 4

10 फेब्रुवारी वसई विरार महापालिकेत 53 गावांच्या समावेशावरुन पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. यासंदर्भात आज आमदार विवेक पंडित आणि वसईमधील स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यात गावे वगळण्याबाबतचा निर्णय अधिवेशनापूर्वी जाहीर केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. याबाबत कोकण आयुक्तांनी आपला अहवाल सादर केला आहे. त्यात केवळ 28 गावेच महापालिकेत घ्यावीत, 53 गावे नकोत, अशी शिफारस आयुक्तांनी या अहवालात केली आहे.

close