लातुरमध्ये 2 विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

February 22, 2016 1:03 PM0 commentsViews:

latur kids

लातूर – 22 फेब्रुवारी : दुष्काळाने होरपळणार्‍या लातूर जिल्हय़ात पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पिण्याचं पाणी आणण्यासाठी साठवण तलावावर गेलेल्या दोन विध्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अहमदपूर तालुक्यातील ब्रम्हपुरी गावात ही घटना घडली.

रोहित भगत (वय 15) आणि मनोहर अशोक हराळे (वय 14) अशी बुडून मरण पावलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. गावात वीज नसल्याने बोअर बंद होती. त्यामुळे रोहित आणि मनोहर हे दोघे पाणी आणण्यासाठी घागरी घेऊन सायकलवरून उगिलेवाडी साठवण तलावावर गेले होते. दुदैवाने या दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेने त्यांच्या गावासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close