राज्यभारात महिला बचत गटांसाठी स्वतंत्र मॉल्स उभारणार – मुख्यमंत्री

February 22, 2016 1:37 PM0 commentsViews:

cm_on_toll

नागपुर -22 फेब्रुवारी : महिला बचत गटांना छोट्या उद्योगांसाठी बिना व्याज कर्ज उपलब्ध केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनी काल (रविवारी) नागपुरमध्ये आयोजित केलेल्या विभागीय मेळाव्यात केली. त्याचबरोबर, बचत गटात तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्यभरात बचत गटांसाठी स्वतंत्र मॉल्स उभारण्यात येतील, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहिर केलं आहे.

या मॉल्समध्ये केवळ माहिला बचत गटांनी केलेली उत्पादनंच विकली जातील. त्यासोबतचं नागपुरात बडकस चौकात बचत गटाचा पहिला मॉल उभारला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेही सहभागी झाल्या होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर बचत गटाच्या समस्या मडंल्या. कर्ज पुरवठ्यासाठी येणार्‍या अडचणी, बँकाकडून होणारा त्रास, बाजारपेठाचे प्रश्न मांडले आणि शून्य टक्के व्याज दराने शासनाने कर्जपुरवठा करावा अशी मागणी केली. बचत गटाच्या वस्तू विक्रीसाठी 12 महिने फिरते प्रदर्शन सुरू करण्याचा विचार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close