किर्लोस्कर उद्योगसमूहाची शताब्दी

March 10, 2010 5:18 PM0 commentsViews: 6

10 फेब्रुवारी देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणार्‍या किर्लोस्कर उद्योगसमूहाला आज 100 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडीत शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला कृषिमंत्री शरद पवारही उपस्थित होते. 10 मार्च 1910 रोजी किर्लोस्कर उद्योगसमूहाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. लक्ष्मणराव किर्लोस्कर मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेचे शिक्षक होते. पण तिथे त्यांचे मन रमले नाही. म्हणून त्यांनी बेळगावात परदेशातून सायकली आणून त्या विकण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यासोबतच त्यांनी शेतीला उपयोगी अवजारे आणि लोखंडी नांगर बनवण्याचे काम सुरू केले. याच उद्योगाचे नंतर वटवृक्षात रुपांतर झाले. राज्यात औद्योगिक विकास साधण्याचे मोठे काम किर्लोस्कर उद्योगसमूहाने केले. त्यासोबतच सामाजिक कार्यातही किर्लोस्करांनी मोठे योगदान दिले आहे.

close