अशोक चव्हाणांना तुर्तास दिलासा, सीबीआयच्या याचिकेवर सुनावणी पुढे ढकलली

February 22, 2016 4:40 PM0 commentsViews:

ashok chavanमुंबई -22 फेब्रुवारी : आदर्श सोसायटी घोटाळ्याचा आरोपींच्या यादीतून काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांचं नाव वगळावे म्हणून सीबीआयनं विशेष न्यायालयात अर्ज केला होता.

त्यावर आज सुनावणी होणार होती ती सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. यावर या प्रकरणाची आता 20 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला दाखल करण्यास नुकतीच राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सीबीआयला परवानगी दिली होती. विशेष न्यायालयासोबत हायकोर्टाने हा अर्ज फेटाळला होता.

या अर्जावर सुनावणी सुरू झालेली नसताना राज्यपालांनी दिलेल्या परवानगीवर चव्हाण यांच्याकडून आक्षेप घेतला जाऊ शकतो. आता या प्रकरणावर 20 एप्रिलला सुनावणी होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close