सलमानच्या जीवाला धोका, मुंबई पोलिसांना धमकीचा कॉल

February 22, 2016 5:14 PM0 commentsViews:

salman_khan3221मुंबई – 22 फेब्रुवारी : अभिनेता सलमान खानला गोळ्या झाडून ठार मारू असा धमकीचा फोन कॉल मुंबई पोलिसांना आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

10 दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने पीसीओवरुन मुंबईच्या पोलीस कंट्रोलला फोन केला होता. त्याने सलमान खानला गोळ्या झाडून ठार मारण्याची धमकी दिली. सुरुवातील हा प्रकार चेष्टामस्करीचा असेल असं वाटलं. पण, आता सलमान खानच्या जीवाला धोका असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलीये. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता हा एका पीसीओवरुन कॉल करण्यात आल्याचं उघड झालंय. हा कॉल कुणी केला असेल याचा तपास मुंबई पोलीस करत आहे. परंतु, सलमान खानला असा कोणताही कॉल आलेला नाही असंही कळतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close