विधेयकात दुरुस्तीची तयारी

March 11, 2010 8:56 AM0 commentsViews: 5

11 फेब्रुवारीमहिला आरक्षण विधेयकावरून सरकार आज एक पाऊल मागे आले. आरक्षण विधेयकाच्या आग्रही मागणीवरून, या विधेयकात सुधारणा करण्यासाठी सरकार सगळ्या पक्षांशी चर्चा करेल, असे प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत सांगितले आहे. या विधेयकाबाबत विरोधकांचे बारीक सारीक मुद्देही लक्षात घेतले जातील, असेही मुखर्जी म्हणाले. त्यामुळे महिला आरक्षणाबाबत आज सरकारला काहीशी नमती भूमिका घ्यावी लागल्याचे चित्र आज संसदेत दिसले.काँग्रेस कोअर कमिटीची बैठक महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेस कोअर कमिटीची बैठक सुरूआहे. या बैठकीत सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी आणि पी. चिदंबरम सहभागी झाले आहेत. दरम्यान महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत डावपेच आखण्यासाठी ममता बॅनर्जी , शरद पवार आणि प्रणव मुखर्जी यांची बैठक झाली. तसेच मुलायमसिंग यादव, लालू प्रसाद यादव, टी. आर. बालू यांचीही प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळी सोनिया गांधीही उपस्थित होत्या.सोनिया उत्सुक नाहीतमहिला आरक्षण विधेयकात बदल करण्यास सोनिया गांधी उत्सुक नाहीत, अशी माहिती मिळत आहे.विधेयकामध्ये मुस्लीम आणि मागासवर्गीय महिलांसाठी जागा राखीव ठेवाव्यात, या विरोधकांच्या मताशी सोनिया फारशा सहमत नाहीत. अर्थात सर्व पक्षीय बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. भाजपमध्ये मतभेदतर या महिला आरक्षण विधेयकावरून भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. यावर चर्चा करण्यासाठी भाजपने आज 5 वाजता बैठक बोलावली आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल.यादवांचा विरोध कायमतर या विधेयकाला लालूप्रसाद, मुलायमसिंग, शरद यादव या तिघांचा विरोध कामय आहे. या विधेयकात बदल करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.

close