समीर भुजबळांना दिलासा नाहीच, 7 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

February 22, 2016 5:26 PM0 commentsViews:

 sameer bhujbal22 फेब्रुवारी : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी नाशिकचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांची न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आलीये. समीर भुजबळांची 7 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आलीये.

समीर भुजबळ यांना मनी लाँड्रिंगच्या प्रकरणामध्ये 1 फेब्रुवारीला ईडीकडून अटक करण्यात आली होती. आज समीर भुजबळ यांची कोठडी संपल्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. हा सगळा 840 कोटींचा घोटाळा असून यापैकी 114 कोटी रुपयांचा शोध लागला असून इतर मालमत्तांचा शोध घेणं सुरू असल्याचा मुद्दा ईडीतर्फे कोर्टात मांडण्यात आला होता. समीर भुजबळ यांचे सीए सुनील नाईक यांनी दिलेल्या माहितीवरूनही अधिक चौकशी सुरू असल्याचे ईडीतर्फे कोर्टात सांगितलं होतं. या चौकशीदरम्यान गुंतागुंतीचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाले असल्याचे आढळून आले आहे असंही ईडीतर्फे कोर्टात सांगण्यात आले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close