वीजनिर्मितीला कचरा देण्यास विरोध

March 11, 2010 9:06 AM0 commentsViews: 8

11 फेब्रुवारीकचर्‍यापासून वीजनिर्मितीच्या नावाखाली सरकार बड्या कंपन्यांना कंत्राटे देऊन कचरा वेचणार्‍यांवर अन्यायच करत आहे, असा आरोप कचरा वेचक संघटनेने केला आहे. पुण्यात बुधवारी कागद, कचरा, पत्रा कष्टकरी पंचायतीतर्फे या महिलांवर होणार्‍या अन्यायाविरोधात इशारा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यासारख्या शहरात रोज लाखो टन कचर्‍याचे वर्गीकरण करून, तो विकून या महिला कुटुंब चालवतात. पण कचरा वेचण्याचे हक्क दुसर्‍यांनाच देऊन सरकार अन्याय करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कचरा उचलून आम्ही पर्यावरणाचाही समतोल साधतो, मग आमच्यावरच अन्याय का, असा सवाल या महिलांनी केला आहे.

close