दोन हजार रुपये द्या आणि ट्रकमधून काहीही घेऊन जा, पोलिसाची लाचखोरी कॅमेर्‍यात कैद

February 22, 2016 10:39 PM0 commentsViews:

पुणे – 22 फेब्रुवारी : पुणे वाहतूक पोलिसांचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झालाय. पुण्याचे वाहतूक पोलीस किती निर्लज्जपणे आणि सर्रास लाच मागतायेत, याचा व्हिडिओ एका प्रेक्षकानं आम्हाला पाठवलाय. प्रकरण असं आहे, की खडकीहून चिंचवडच्या दिशेनं जाणारे ट्रक थांबवून चालकांकडे दोन-दोन हजारांची लाच मागितली जातेय. दोन हजार रुपये द्या आणि ट्रकमधून कितीही आणि काहीही घेऊन जा, अशी एक योजनाच पोलिसांनी उघडलीय.

पुणे वाहतूक पोलिसांमधील भ्रष्ट अधिकारी कसे काम करत आहेत याचा एक धक्कादायक व्हिडिओ आयबीएन लोकमतच्या प्रेक्षकांनी आम्हाला दिलाय. खडकीहून चिंचवडच्या दिशेने चाललेल्या ट्रकला अडवून दोन हजार रूपयांची लाच देण्याची जबरदस्ती खडकी वाहतूक विभागाचे पीएसआय सोनवणे हे कॉन्स्टेबलच्या माध्यमातून करत असल्याच उघड झालंय. pune_police3

सुनिल जगताप हे ट्रकचे सर्व कागदपत्र नियमात असतानाही त्यांना नोएंट्री असल्याचं सांगून पैसे देण्याचा आग्रह करत असल्याचं दिसतंय तर त्यानंतर बाजूला गेल्यावर कॉन्स्टेबल गाडीच्या नंबरची यादी दाखवत हे सगळे दोन हजार रूपये देऊन नियमित जातात मग ओव्हलोड गाडी असेल किंवा कागदपत्र नसतील तरी कुणी कारवाई करत नाहीत अस सांगतोय हे सगळ धक्कादायक आहे.

शहरातून ट्रक घेऊन जाण्यासाठी दोन हजार रूपये द्या आणि कागदपत्र नसलेला ट्रकही बिनधास्त न्या त्यात काहीही ठेवा अशी स्कीम या वाहतूक पोलिसांनी उघडलीये. महत्वाचं म्हणजे या पीएसआयची अडीच वर्षात अशाच तक्रारीमुळे चार वेळा बदली करण्यात आलीये पण त्यांना त्याची अजिबात फिकीर नाही. पुण्यात वाहतूक पोलिसांची सर्रास अशी वाटमारी सुरूच आहे. आता वाहतूक पोलिसांच्या शाखेकडून यांच्यावर काय कारवाई केली जातेय हे पाहण जास्त महत्वाचं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close