संसदेचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

February 23, 2016 8:53 AM0 commentsViews:

parliament of india general

दिल्ली – 23 फेब्रुवारी :  संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरूवात होत आहे. या अधिवेशनात जीएसटीसह अन्य महत्त्वाची विधेयकं पास करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. त्याचवेळी हैद्राबाद विद्यापीठातील वेमुला हत्या प्रकरण, जेएनयू वाद, जाट आरक्षणाच्या मुद्यावरून पेटलेला हरयाणा, तसंच पठाणकोट हवाईतळावर झालेला दहशतवादी हल्ला, या मुद्यावरून विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न केला जाणार असल्याने हे अधिवेशनही वादळी ठरण्याची शक्यता आहे.

अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्वपक्षीय बैठकीत कामकाज सुरळीत पाडण्याची अपेक्षा विरोधी पक्षांकडे व्यक्त केली. मात्र, तशी शक्यता कमी असल्याचे दिसून येते. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या अभिभाषणाने आजपासून (मंगळवारी) संसदेच्या अर्थकंकल्पीय अधिवेशनला सुरूवात होणार आहे. 23 फेब्रुवारी ते 16 मार्च आणि 25 एप्रिल ते 13 मे अशा दोन टप्प्यात हे अधिवेशन होणार आहे. यामध्ये 25 फेब्रुवारी रोजी रेल्वे अर्थसंकल्प, 26 फेब्रुवारीला आर्थिक पाहणी अहवाल, तर 29 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close