संजय दत्तची गुरुवारी होणार सुटका

February 23, 2016 9:59 AM0 commentsViews:

ECC_1434433787_16june2015_SanjayDutt

पुणे-23 फेब्रुवारी-  मुबंईतील 1993 रोजी झालेल्या बॉम्बस्पोटादरम्यान बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी शिक्षा भोगणार्‍या संजय दत्तची येत्या गुरुवारी तुरुगांतुन सुटका होणार आहे.  25 फेब्रुवारी (गुरवारी) सकाळी 9.30 वाजता तो बाहेर पडेल. विशेष म्हणजे, शिक्षा संपण्याच्या 8 महिन्या आधीच तो तुरुगांतुन सुटणार आहे. तुरूंगात चांगल्या वर्तनाच्या बदल्यात सर्व कैद्यांना त्यांच्या शिक्षेत सूट मिळते. त्यापार्श्वभूमीवर, संजय दत्तच्या शिक्षेतही कपात करण्यात आली आहे.

संजय दत्तच्या स्वागतासाठी त्याच्या कुटुबियांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. संजयला जेलबाहेर त्याची पत्नी आणि त्यांची मुलं त्याला घ्यायला येणार आहेत. तर दुसरीकडे, संजय दत्तला निरोप देण्यासाठी कोणताही विशेष समारंभ होणार नसल्याचं कारगृह प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. त्यासोबतच, संजय दत्तने आजवर केलेल्या कागदी पिशव्या बनवल्याच्या कामाची कामाईचे 440 रुपये त्याला जेलमधून बाहेर पडताना देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

मुबंईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्पोटात संजय दत्तला 5 वर्षाची तुरुगंवासाची शिक्षा करण्यात आली होती.मात्र त्या खटल्याच कामकाज सुरु असताना त्याने 18 माहिने तुरुंगात काढल्यामुळे त्याला साडेतीन वर्षाचा कालावधी तुरुगांत काढावा लागणार होता. 21 में 2013 पासुन संजय दत्त पुण्याचा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. यापूर्वी पॅरोल आणि फर्लो अंतर्गत मिळणार्‍या सुट्‌ट्यांमुळेही संजय दत्तवर टीका झाली होती.

दरम्यान, मुंबईतील भेंडी बाजार इथल्या नूर मोहम्मदी या हॉटेलमध्ये मोफत चिकन दिले जाणार आहे. संजय दत्तला चिकन फार आवडतं. सहा वर्षांपूर्वी संजय दत्तने या हॉटेलच्या मालकाला चिकन रेसीपी दिली. त्यामुळे या डिशला ‘चिकन संजूबाबा’ असं नाव देण्यात आलं. आता संजयच्या सुटकेचा आनंद साजरा करण्यासाठी गुरूवारी दुपारी 12 ते रात्री 12 या कालावधीत ग्राहकांना ही डिश मोफत देण्यात येणार असल्याचे हॉटेल मालकांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close